

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलभावी जवळील चिगरीमा क्रॉस, जवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा विकत असल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला समजली त्यानंतर सीईएन पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केल. त्यांच्याकडून 5 किलो 652 ग्रॅम गांजा जप्त केला.
ताजिब अब्दुलरजाक मुल्ला(वय 25 रा. मल्लापूर पी.जी. ता.गोकाक सध्या रा. चिकोडी), अनुराग उदयकुमार यरनाळकर (वय 35, रा. संकेश्वर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कंट्रोल रूमचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व सीईएन विभागाच्या पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली. दोन्ही संशयितांकडून 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा गांजा, 60 हजार रुपये किमतीची दुचाकी, 21 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन आणि एक बॅग असे एकूण 1 लाख 91 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले.
दोघांविरुद्ध बेळगाव सीईएन पोलिस स्थानकात एनडीपीएस कायद्याच्या कलम 20(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीईएन पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.