Belgaum News : अपहरणाची तक्रार खोटी, आफत मोठी

तक्रारदार भावाला न्यायालयाकडून १० हजारांचा दंड
Fine
Fine
Published on: 
Updated on: 

बेळगाव : आपल्या भावाचे अपहरण झालेले असूनही पोलिसांनी एफआयआर दाखल न केल्याचा आरोप करत न्यायालयात थेट हिबीयस कॉर्पस्‌ याचिका दाखल करणाऱ्या भावाला न्यायालयाने १० हजारांचा दंड ठोठावला आहे.

अमर रायमाने (रा. नसलापूर, ता. रायबाग) याने धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली होती. अधिक माहिती अशी, अमरचा भाऊ आकाश रायमाने धारवाड येथे एमबीएचे शिक्षण घेतो. त्याच्यासोबत शिकणाऱ्या धारवाड येथील एका तरुणीशी त्याची ओळख झाल्यानंतर ते दोघे गेली चार वर्षे एकत्रित आहेत. आकाश त्या तरुणीच्या घरीच वास्तव्यास असतो. या तरुणीची आई सरकारी अधिकारी आहे. त्यांनी या तरुणाला शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी मोठी रक्कम दिली. परंतु, ही रक्कम गमावल्यानंतर तो धारवाड सोडून आपल्या गावी जाऊन राहिला होता. तेव्हापासून सदर तरुणी व तिची आई आकाशकडे पैशाचा तगादा लावत होते. वाद मिटवून येतो, असे सांगत आकाश ७ ऑक्टोबर रोजी नसलापूरहून बेळगावला आला होता. दोन दिवसांनी आकाशचा भाऊ त्याला शोधत बेळगावला आला. मात्र त्याचा पत्ता न लागल्याने त्याने मार्केट पोलिस ठाणे गाठले.

खोटी फिर्याद महागात

मार्केटचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यानी आकाश नेमका कुठे गेला, त्याचे सीसीटीव्ही फुटेजसह सर्व पुरावे दिल्यानंतरही अमर रायमानेने बुधवारी धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली. आपल्या भावाचे अपहरण झालेले असताना बेळगावचे पोलिस आयुक्त व मार्केटचे पोलिस निरीक्षक आपली फिर्याद घेत नाहीत, असा युक्तिवाद त्याने केला.

तत्पूर्वी मार्केट पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास आकाशचा शोध घेतला होता. त्यांनी आकाशला न्यायालयासमोर हजर केले आणि आकाशनेही मी स्वतःहून धारवाडला गेलो असल्याचे सांगितले. परिणामी, उच्च न्यायालयाने न्यायालयाची दिशाभूल केल्याची टीका करत याचिकादार अमर रायमाने यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news