Belgaum Fridge Blast : बाप-लेकाचाही अखेरचा श्वास

चव्हाट गल्ली जळीतकांड : कुटुंबातील मृतांची संख्या सहावर
Belgaum Fridge Blast : बाप-लेकाचाही अखेरचा श्वास
Published on
Updated on

बेळगाव : गणेशोत्सवाच्या आनंदात असलेल्या धमुणे कुटुंबावर काळाने घातलेला घाला अधिक तीव्र झाला असून, फ्रीजचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत जखमी झालेल्या बाप-लेकाचाही बुधवारी मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे आई, दोन मुली आणि त्यांची आत्या अशा चौघींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आगीत मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. पूर्ण धमुणे कुटुंबच उद्‌ध्वस्त झाले आहे.

चव्हाट गल्ली-ढोर गल्लीत मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्निकांडात चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यात दोन मुली आणि त्यांच्या आईचा समावेश होता. गंभीर जखमी झालेले महिलेचे पती गजानन राजाराम धमुणे (६५) आणि त्यांचा मुलगा रोशन गजानन धमुणे (२१) यांचाही बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबातील केवळ निशा ही विवाहित मुलगी बचावली आहे.

शारदा गजानन धमुणे (वय ४७), त्यांची मुलगी प्रिया गजानन धमुणे (वय२८), गंगा गजानन धमुणे (वय २५) आणि नणंद भारती राजाराम धमुणे (वय ५१) यांचा घरातच मृत्यू झाला होता. गंभीररीत्या भाजलेले गजानन आणि रोशन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आले नाही.

सणाच्या आनंदावर शोककळा

गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या धमुणे कुटुंबावर काही तासांतच दुःखाचा डोंगर कोसळला. माय-लेकींसह नणंद आणि त्यानंतर पिता-पुत्राचा झालेला मृत्यू मन हेलावून टाकणारा ठरला आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने चव्हाट गल्ली-ढोर गल्ली परिसरात शोककळा पसरली असून, या दुर्घटनेमुळे बेळगाव शहरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news