बेळगाव : घर बदलण्यावरून पत्नीचा खून

बेळगाव : घर बदलण्यावरून पत्नीचा खून
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  पावसाळा सुरू होतोय, सध्या राहतोय ते घर पडायला आले आहे. आपण भाडोत्री घरात राहायला जाऊ, असे पत्नी म्हणाली. त्यातूनच भांडण होऊन पतीने पत्नीवर विळ्याने वार करत तिचा खून केला. प्रमोदिनी संपत सोमनाचे (वय 45, रा. गणेशपेठ गल्ली, जुने बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. पती संपत सोमनाचे याला अटक झाली आहे.

गणेशपेठ गल्ली येथे सोमनाचे दाम्पत्य राहते. त्यांना मूलबाळ नाही. ते दोघेच राहत असत. शनिवारी सायंकाळी 4.45 वाजता पत्नी प्रमोदिनीने पतीला सांगितले की, पावसाळ्यामुळे घराच्या भिंती भुसभुशीत बनल्या आहेत. केव्हा कोसळतील याचा नेम नाही. त्यामुळे आपण हे घर बदलून दुसरीकडे भाडोत्री राहायला जाऊ. यावरून दोघांमध्ये भांडण जुंपले. रागाच्या भरात पती संपतने पत्नीवर विळ्याने वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता रात्री अकराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पती संपत शंकर सोमनाचे (47, रा. गणेशपेठ, जुने बेळगाव) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहापूरचे प्रभारी निरीक्षक श्रीनिवास हंडा यांनी 24 तासांत संपतला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. श्रीनिवास हंडा तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news