Prakash Margale: ‘मध्यवर्ती‌’ अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे

हौतात्म्य पत्करण्यासही तयार; सीमालढ्याला नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा
Prakash Margale
Prakash MargalePudhari
Published on
Updated on

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खजिनदार प्रकाश मरगाळे यांची निवड करण्यात आली. दीपक दळवी यांच्या निधनामुळे हे पद रिक्त होते.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी (दि. 31) मराठा मंदिरच्या कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. बैठक सुरू होताच किणेकर म्हणाले, दीपक दळवी यांच्या निधनामुळे मध्यवर्ती समितीचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. या जागेवर दळवींसोबत काम केलेले तितकेच तडफदार प्रकाश मरगाळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी. महाराष्ट्रातील नेतेमंडळींशीही त्यांचा जवळचा संबध आहे. माजी महापौर मालोजी अष्टेकर म्हणाले, प्रकाश मरगाळे आणि दीपक दळवी यांनी समितीचे आमदार बळवंतराव सायनाक यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे दळवी यांच्या पश्चात मरगाळे यांनी अध्यक्षपद स्वीकारावे.

माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, 1985 पासून दीपक दळवी सीमालढ्यात योगदान देत आले होते. त्यांच्या आधीपासूनच मरगाळे काम करत होते. त्यांची निवड सीमालढ्याला प्रेरक ठरेल. माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील म्हणाले, सीमालढ्यात मरगाळे यांनी प्रसिद्धीपासून दूर राहून, कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काम केले आहे. त्यांच्यामुळे सीमालढ्याला चालना मिळेल.

त्यानंतर प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी मान्यता दिली. आबासाहेब दळवी, रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोहनगेकर, नारायण सांगावकर, रावजी पाटील, मनोहर हुंदरे, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, गोपाळ पाटील यांसह मध्यवर्तीच्या साऱ्या सदस्यांनी निवडीचे स्वागत केले. त्यानंतर मरगाळे यांचा सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news