

बेळगाव : टिळकवाडीतील बीएससी दी टेक्स्टाईल मॉलचा वार्षिक डबल डिस्काऊंट धमाका रविवारपासून (दि. 6) सुरु होणार आहे. फ्रेश स्टॉकवर 10 अधिक 10 टक्के असा हा डिस्काऊंट राहणार आहे. पुढील चार आठवडे ही ऑफर चालणार असून बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीएससी मॉलचे व्यवस्थापकीय संचालक बी. यु. चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, वर्षभर ग्राहक मॉलमध्ये खरेदी करुन आम्हाला सहकार्य करतात. श्रावणासह या महिन्यात येणार्या इतर सणांच्या निमित्ताने ग्राहकांना कमी दरात कापड खरेदी करता यावे, यासाठी आम्ही ही डबल डिस्काऊंटची योजना राबवतो. मॉल सुरु झाल्यापासून येथे नियमित 10 टक्के डिस्काऊंट सर्वच ब्रॅन्डेड कंपन्यांच्या शुटिंग, शर्टिंग, रेडिमेडसह सर्व प्रकारच्या कपड्यांवर डिस्काऊंट दिला जातो. आता त्यात आणखी 10 टक्के वाढवून डबल डिस्काऊंट दिला जाणार आहे. फ्रेश ब्रॅन्डेड कंपनीचे कपडे या ऑफरमध्ये ग्राहकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यंदा डबल डिस्काऊंटचे चौथे वर्ष आहे.
अन्य व्यावसायिकांसारखा जुना स्टॉक विक्रीला काढण्यासाठी हा डिस्काऊंट देत नाही, तर फ्रेश स्टॉकवर हा डिस्काऊंट असतो. उत्पादकांकडून थेट खरेदी करुन नव्याने आलेल्या साड्या, लेडिजवेअर, मेन्सवेअर व किड्सवेअर तसेच होम फर्निशिंगवर हा डिस्काऊंट दिला जाणार आहे, असे चंद्रशेखर यांनी सांगितले.
बी. सी. वेद म्हणाले, बेळगावात बीएससी मॉल अस्तित्वात आल्यापासून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद आहेच. परंतु, सांगली कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहकांची गर्दी होत आहे. पुढील चार आठवडे श्रावण महिन्यात डबल डिस्काऊंट दिला जाणार असल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. स्टोअर मॅनेजर अमजद जमादार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मार्केटिंग मॅनेजर इराण्णा शिवशेट्टी यांनी आभार मानले.
दर्जेदार उत्पादने असलेल्या काही मर्यादित स्टॉकच्या विक्रीसाठी बीएससी मॉलने स्पेशल काऊंटर सुरु केले आहे. सोमवार ते शुक्रवार रोज दुपारी बारा वाजता हे स्पेशल काऊंटर सुरु होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना अविश्वसनीय किंमतीत कपडे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
बीएससी मॉलमध्ये इमिटेशन ज्वेलरीचे दालन आधीपासूनच आहे. परंतु, ग्राहकांच्या मागणीनुसार येथे रिअल सिल्वर ज्वेलरी दालन सुरु केले आहे. दुसर्या मजल्यावर असलेल्या या दालनात ग्राहकांना विविधांगी व आकर्षक चांदीचे खरे दागिने खरेदीची संधी मिळणार आहे.