ATM robbery case : गॅस कटरने एटीएम फोडून १९.२९ लाखांची रोकड लंपास

Belgaum news : गोलसंगीत मध्यरात्री धाडसी चोरी; निडगुंदी पोलिसांकडून तपासाला वेग
ATM robbery
ATM robbery
Published on
Updated on

अंकली : विजापूर जिल्यातील निडगुंदी तालुक्यातील गोलसंगी गावात कॅनरा बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १९ लाख २९ हजार रुपयांची रोकड लंपास केली. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड काढून घेतली आणि तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच विजयपूरचे पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, बसवनबागेवाडीचे डीवायएसपी चंद्रकांत नंदरेड्डी, निडगुंदीचे सीपीआय शरणगौडा गौडर, पीएसआय यतीश के. एन., कूडगीचे पीएसआय मल्लिकार्जुन तळवार, क्राईम विभागाचे पीएसआय व्ही. एच. हत्तळी, कोल्लारचे पीएसआय अशोक नायक तसेच कॅनरा बँकेचे प्रादेशिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

ATM robbery
Belgaum News: कॅंटोन्मेंट मालमत्तांचे तूर्त हस्तांतरण नाहीच

अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून बँक व्यवस्थापक शरणप्पा एस. होनवाड व कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. एटीएम परिसर तसेच आजूबाजूच्या भागातील हालचालींचीही पाहणी करण्यात आली. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून बँकेसमोरील रस्त्यावर क्रमांक नसलेली एक संशयित कार वारंवार फिरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या कारमधून आलेल्या व्यक्तींनीच चोरी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता होणार आहे.

ATM robbery
Belgaum Murder Case: भोसकला चाकू, भासवला अपघात

या प्रकरणी कूडगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी मनगुळी येथील कॅनरा बँक तसेच चडचण येथील एसबीआय बँकेतही मोठ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे एटीएम चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news