Belgam Cyber Alert | सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे

हेमंत देशमुख : जिल्हा सहकारी बँक असोसिएशनतर्फे कार्यशाळा
Belgam Cyber Alert
बेळगाव : दीपप्रज्वलन करताना बाळासाहेब काकतकर. शेजारी बाळाराम पाटील, मंजुनाथ सेठ, हेमंत देशमुख, सचिन गुंजीकर, नितीन कदम, अमित लोकरे, डॉ. पवन फलक आदी.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

बेळगाव : डाटा चोरणे आणि पैशांची लूट करणे हे सायबर गुन्हेगारांचे मुख्य उद्देश असतात. एखाद्या बँकेचा डाटा चोरुन तो काळ्या बाजारात विकण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. त्यामुळे, बँकेची पत कमी होत असल्याने सर्व संचालक व कर्मचार्‍यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे मत कोमल इन्फोटेकचे हेमंत देशमुख यांनी केले.

देशमुख यांनी सायबर गुन्हेगारीबाबत रिझर्व्ह बँकेकडून येत असलेल्या नवनव्या परिपत्रकांची माहिती दिली. सायबर गुन्हेगारी करण्यासाठी इंटरनेटचा कसा उपयोग केला जातो, याची माहितीही त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर सायबर गुन्हेगारी टाळण्यासाठी आपला पासवर्ड 15 ते 21 दिवसांतून एकदा बदलावा असेही सांगितले.

Belgam Cyber Alert
Belgam News | प्रत्येक शाळेतील वर्ग स्मार्ट बनविणार

दुसर्‍या सत्रात सचिन गुंजीकर, नितीन कदम यांनी तर तिसर्‍या सत्रात अमित लोकरे व डॉ. पवन फलक यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी मराठा बँकेचे अध्यक्ष बाळाराम पाटील, पायोनियर बँकेचे अध्यक्ष प्रदीप अष्टेकर, बसवेश्वर बँकेचे अध्यक्ष रमेश कळसण्णावर, तुकाराम बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासह विविध बँकांचे संचालक, व्यवस्थापक, सीईओ उपस्थित होते. मंजुनाथ सेठ यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news