Karnataka rain alert: बेळगावसह अनेक भागांत तीन दिवस पावसाची शक्यता

हवामान खात्याने बेळगाव, बंगळूरसह राज्याच्या अनेक भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे
Rain alert
Rain alertPudhari
Published on
Updated on

बंगळूर : हवामान खात्याने बेळगाव, बंगळूरसह राज्याच्या अनेक भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावेळी बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, कोलार, चामराजनगर व रामनगर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

किनारपट्टीवरील कारवार, बेळगाव, उडुपीसह बागलकोट, गुलबर्गा, विजापूर, धारवाड व हावेरी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंगळूरमध्ये कमाल तापमान 33 अंश, तर किमान तापमान 22 अंश राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान यादगीरमध्ये नोंदवले जाण्याची शक्यता असून तेथे 37 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील. बळ्ळारी, गुलबर्गा व बागलकोटमध्येही तापमान 36 अंश राहण्याची शक्यता आहे.

बळ्ळारी, बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग, कोलार, रामनगर, तुमकूर, कोप्पळ, रायचूर व यादगीर जिल्ह्यात 10 एप्रिलपर्यंत वारा व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगळूरमध्ये पुढील 48 तासांसाठी अंशतः ढगाळ हवामान राहील. संध्याकाळी किंवा रात्री पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news