Belagavi Petrol Pump Attack: बाटलीतून पेट्रोल न दिल्याने पंपचालकावर हल्ला

सहाजणांवर गुन्हा : सुतगट्टीजवळील पंपावरील घटना
Petrol Pump
Petrol PumpFile Photo
Published on
Updated on

बेळगाव : बाटलीतून पेट्रोल न दिल्याने पंपचालकावर हल्ला केल्याची घटना चार दिवसांपूर्वी सुतगट्टीत घडली. या प्रकरणाची नोंद बुधवारी (दि. १७) रात्री काकती पोलिसांत नोंद झाली आहे. पंपचालक रणवीर महेश हलगेकर (रा. हिंदवाडी, बेळगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सुतगट्टी गावाजवळ रणवीर पेट्रोलियम्स्‌ नावाचा पेट्रोल पंप आहे. १२ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास काहीजण पंपावर गेले. यापैकी संपत निंगाप्पा गेद्देली याने प्लास्टिक बाटलीमध्ये पेट्रोल मागितले. यावेळी पंपावरील कर्मचाऱ्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने व सरकारी नियमानुसार प्लास्टिक बाटलीत पेट्रोल देण्यावर जिल्हा व पोलिस प्रशासनाने निर्बंध घातले असल्याचे सांगितले. परंतु, पेट्रोल हवेच, असे म्हणत संपतने भांडण काढले. यावेळी पंपचालक रणवीर तेथे गेले. संशयिताने त्यांच्याशीही भांडण काढत अर्वाच्च शिवीगाळ केली. तसेच अन्य काही सहकाऱ्यांना बोलावून घेत रणवीर यांना मारबडव केली.

शुक्रवारी (दि. १२) घडलेल्या या घटनेनंतर बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास रणवीर यांनी काकती पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संदीप गेद्देली याच्यासह राकेश मल्लिकार्जुन चौगले, परशुराम बसाप्पा तुबाकी, आनंद रमाप्पा तिरगू, रमेश देवाप्पा वण्णुरी, आकाश करियाप्पा मडीवाळ यांच्यासह अन्य चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. काकतीचे निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news