Nipani Car Fire | निपाणी-अकोळ मार्गावर धावत्या कारला आग; प्रसंगावधानाने चालक बचावला

बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
Nipani Akol road car fire
निपाणी-अकोळ मार्गावर कारला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान Pudhari
Published on
Updated on

Nipani Akol road car fire

निपाणी: निपाणी-अकोळ मार्गावर सोमवारी (दि.२) सायंकाळी चारच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ कार थांबवून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

हंड्यानवाडी (ता. चिकोडी) येथील रामदास महादेव लडवे यांनी ही कार नुकतीच खरेदी केली होती. कार दुरुस्तीसाठी ते निपाणी येथे आले होते. दुरुस्तीनंतर ट्रायलसाठी निपाणी-अकोळ मार्गावर जात असताना अचानक बॅटरीत स्पार्क झाला आणि काही क्षणांतच वाहनाच्या मागील भागाने पेट घेतला.

Nipani Akol road car fire
Nipani news: निपाणी परिसरात तंबाखू चाकीच्या कामांना वेग

रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका नागरिकाने चालकाला आगीची सूचना दिल्यानंतर त्यांनी तातडीने वाहन थांबवून बाहेर पळ काढला. दरम्यान, आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच निपाणी अग्निशमन दलाचे निरीक्षक एस. एन. नांगनुरे यांनी कर्मचारी एस. टी. दलवाई, एस. आय. खिचडी, जे. डी. कमते, जी. एस. कांबळे, महेश कांबळे आणि बाळाप्पा मंगसुळे यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

Nipani Akol road car fire
Nipani News: आयफोनच्या हट्टापायी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सीपीआय बी. एस. तळवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद निपाणी अग्निशमन दलात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news