Belgaum Fraud Case : खानापुरात दोघांची 41 लाखांची फसवणूक

पंधरा दिवसांतील घटना ः गेमसह शेअर मार्केटमध्ये लाभाचे आमिष
Khanapur Fraud Case
खानापुरात दोघांची 41 लाखांची फसवणूक
Published on
Updated on

बेळगाव ः ऑनलाईन गेम खेळून रोज 3 हजार रूपये मिळवा, असे आमिष दाखवत एकाची 40 लाखांची फसवणूक केली. दुसऱ्या एकाला शेअर मार्केटमध्ये जादा लाभ मिळविण्याचे सांगत 15 लाख रूपयांना गंडा घातला. फसणाऱ्यांमध्ये खानापूर शहरातील दोघांचा समावेश आहे. गेल्या पंधरा दिवसांत या दोन्ही घटनांची जिल्हा सीईएनकडे नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 40 लाख फसलेल्या व्यक्तीला 13 लाखाची रक्कम परत मिळाली आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा 41 लाखांचा आहे.

Khanapur Fraud Case
Belgaum News : गांधीनगर-धर्मवीर संभाजी चौक उड्डाणपुलासाठी २७५ कोटी

खानापुरातील मुस्लीम गल्ली परिसरात राहणाऱ्या एकाची 40 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सदर व्यक्तीला मे महिन्यात एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. एव्हिएटर नामक ऑनलाईन गेम असून तो व्यवस्थितरित्या खेळल्यास रोज 3 हजार रूपये कमावण्याचे आमिष समोरच्या व्यक्तीने दिले. त्यानंतर दुसऱ्या दोन क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज करत त्यावरून लिंक पाठवली. फिर्याददाराच्या नावे एक खाते तयार करून तेथे रक्कम ट्रान्स्फर करून खेळण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीने त्या खात्यावर आधी 2 ते 3 लाख रूपये घालून गेम खेळण्यास सुरवात केली. परंतु, ही सर्व रक्कम गेली. यानंतर त्याने खेळणे बंद केले असता समोरच्या व्यक्तीने हा गेम आहे, आणखी रक्कम घालून खेळा, तुम्हाला मोठी रक्कम मिळेल, असे सांगितले. विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीने 4 मे ते 4 डिसेंबर 2025 या काळात तब्बल 39 लाख 82 हजार रूपये टप्प्याटप्प्याने घातले. यापैकी भामट्यांनी 12 लाख 91 हजाराची रक्कम परत दिली. उर्वरित रक्कम हवी असल्यास आणखी गेम खेळावा लागेल, असे म्हणत अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपण फसलो आहोत, हे लक्षात येताच संबंधिताने 27 लाख रूपये परत न आल्याची फिर्याद जिल्हा सीईएनमध्ये दिली आहे.

15 लाखांची फसवणूक

खानापूर शहरातील आणखी एकाची 14 लाख 99 हजाराची फसवणूक केल्याची नोंदही जिल्हा सीईएनकडे झाली आहे. सदर व्यक्ती डॉक्टर असून त्यांना 3 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन करून स्टॉक मार्केटमध्ये रक्कम गुंतवल्यास 10 ते 30 टक्के लाभांश देण्याचे आमिष दाखवले. एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेत त्यावर 10 नोव्हेंबर रोजी 1 हजाराची रक्कम गुंतवण्यास सांगितली. त्यावर नफा देऊन तो काढूनही घेतला. यानंतर विश्वास ठेवत त्यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल 15 लाख रूपयांची रक्कम गुंतवली. ती रक्कम परत न मिळाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणांची नोंद करून घेत जिल्हा सीईन पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Khanapur Fraud Case
Belgaum Winter Session : गृहलक्ष्मी योजनेतून महिलांचे सक्षमीकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news