

बेळगाव : जगात काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असल्याने सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. मंगळवारी (दि. 25) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी आली. त्यामुळे प्रतिदहा ग्रॅम तीन हजार रुपये वाढ झाली आहे. बेळगावात हा दर 1 लाख 27 हजारांवरून 1 लाख 30 रुपये झाला आहे. चांदीचा दर स्थिर असून प्रति किलो 1 लाख 60 हजार रुपये आहे.
मंगळवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमला 1 लाख 27 हजार रुपये होता. दिवसभरात तासातासाने दर बदलल्याने अखेरीस त्यात तीन हजाराने वाढ झाली. त्यामुळे हा दर 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोेचला. चांदीच्या दरातही बदल झाले असून सध्या चांदीचा दर प्रतिकिलो सुमारे 1 लाख 60 हजार रुपये आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस असून सोने व चांदी खरेदीला उधाण आले आहे; मात्र दरात झालेली वाढ खिशाला कात्री लावणारी ठरत आहे.