Job Fraud: विदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

चौघांची फसवणूक : किणये, कोल्हापूरच्या युवकांविरुद्ध गुन्हा
Job Fraud
Job FraudPudhari
Published on
Updated on

बेळगाव : परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. किणये (ता. बेळगाव) येथील लक्ष्मण देसाई आणि कोल्हापूर येथील सुमित शिंदे अशी फसवणूक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सीईन पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पिरनवाडी येथील प्रथमेश देसाई, बंडू इंगळ, किरण देसाई आणि किणये गावातील अनिल पाटील यांना विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष लक्ष्मण आणि सुमित यांनी दिले होते. त्यासाठी 26 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी स्थानिक बँकेत वरील चौघांच्या नावे खाती उघडली. शिवाय त्या खात्यांचे पासबुक आणि एटीएम कार्ड ताब्यात घेतले. नंतर त्या खात्यांवर पैसे ट्रान्सफर करून बँक खात्यांचा गैरवापर केला आहे. मात्र आतापर्यंत नोकरी दिली नाही. त्यामुळे प्रथमेश आणि इतरांनी बेळगाव शहर सीईएन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news