

अथणी : येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद त्या मुलीच्या आईने अथणी पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, सदर मुलगी 10 जानेवारी रोजी सकाळी लघुशंकेला जाते असे सांगून घरातून बाहेर गेली ती परत आली नाही. त्यामुळे तिचे अपहरण केल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आली आहे. अथणी पोलिसांनी तपास केल्यावर बंगळूर येथे मुलीचा शोध लागला. तिच्याकडून अधिक माहिती जाणून घेतल्यावर तिने अत्याचार करण्यात आल्याची माहिती दिली.
याप्रकरणी इकबाल अमीनसाहेब शेख ( वय 21, रा. धर्मट्टी, ता. मुडलगी, सध्या रा. चिकट्टी) याने अत्याचार केल्याची माहिती मुलीने दिली आहे. त्याच्यासोबत रोहित संतोष छिद्रे (वय 19, रा. अथणी) व श्रीधर रवी पत्तार (रा. चिकट्टी, ता. अथणी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.