‘अलमट्टीत’ एक लाख क्युसेक पाण्याची आवक Almatti water(Pudhari Photo)
बेळगाव
Almatti Dam News | ‘अलमट्टीत’ एक लाख क्युसेक पाण्याची आवक
70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
बेळगाव : सोमवारी (दि. 23) 1 लाख 83 क्युसेक पाण्याची आवक होत असून, 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र आणि पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे अलमट्टी जलाशय आताच 62.13 टक्के भरला आहे.
जलाशयाची क्षमता 519.60 मीटर म्हणजेच 123.081 टीएमसी इतकी आहे; पण जलाशयात आताच 516.32 मीटर इतके म्हणजेच 76.475 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळपासून जलाशयातून 70 हजार क्युसेक पाण्याचा नदीत विसर्ग करण्यात येत आहे.

