Beggar Woman’s House ₹8.40 Lakh Cash | आयुष्यभर ‘ती’ भीक मागून जगली; साडेआठ लाख रु. भावांना ठेवून गेली

कर्नाटकात भिकारी वृद्धेच्या घरात ३० पोत्यांमध्ये सापडली ८.४० लाखांची रोकड
Beggar Woman’s House ₹8.40 Lakh Cash  |
मंंड्या : भिक्षेकरी वृद्धेच्या घरात ८ लाख ४० हजार रुपयांची रोकड सापडली.
Published on
Updated on

बंगळूर; वृत्तसंस्था : कर्नाटकातील मंड्या शहरात आयुष्यभर रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका ६८ वर्षीय वृद्धेचा आजारपणामुळे मृत्यू झाला. तिच्या निधनानंतर जेव्हा स्थानिकांनी तिच्या घराची पाहणी केली, तेव्हा थक्क करणाऱ्या घटनेत घरातून लाखो रुपयांची रोकड आढळली. आयुष्यभर गरिबीत आणि हलाखीत दिवस काढणाऱ्या या महिलेकडे एवढी मोठी संपत्ती पाहून स्थानिक नागरिकही अचंबित झाले.

३० पोत्यांमध्ये भरून ठेवल्या नोटा, नाणी

हूर असे या मृत वृद्धेचे नाव असून ती मंड्या येथील एका भाड्याच्या खोलीत राहात होती. तिच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी घरात प्रवेश केला असता तिथे १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा तसेच हजारो नाण्यांनी भरलेली ३० पेक्षा जास्त पोती आढळली. ही सर्व पोती बाहेर काढून पैसे मोजण्यास सुरुवात केली. मोजणीअंती ही रक्कम ८ लाख ४० हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

एका भावाने वाट्याला आलेली रक्कम मशिदीला केली दान

हूर ही तिच्या बहिणीसोबत या घरात राहात होती. दोघींचेही लग्न झाले नव्हते. दोन वर्षांपूर्वी तिच्या बहिणीचेही निधन झाले होते. त्यानंतर ती एकटीच भीक मागून दिवस काढत होती. मोजणी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तिच्या दोन भावांकडे सुपूर्द करण्यात आली. यातील एका भावाने ६ लाख रुपये स्वतःकडे ठेवले, तर दुसऱ्या भावाने वाट्याला आलेले २ लाख ४० हजार रुपये जवळच्या मशिदीला दान केले.

* मंड्या येथे ६८ वर्षीय हूर नावाच्या भिक्षेकरी वृद्धेचा वृद्धापकाळाने घरी मृत्यू झाला.

* घरात ३० हून अधिक पोत्यांमध्ये नाणी आणि नोटांच्या स्वरूपात ८.४० लाख रुपये सापडले.

* मृत महिलेच्या पश्चात सापडलेली ही संपूर्ण रक्कम तिच्या दोन भावांच्या स्वाधीन करण्यात आली.

* एका भावाने मिळालेल्या २.४० लाख रुपयांपैकी संपूर्ण वाटा स्थानिक मशिदीला दान केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news