बेळगाव : स्‍कूल बस-ट्रॅक्‍टरची समोरासमोर धडक; ४ विद्यार्थ्यांचा मृत्‍यू | पुढारी

बेळगाव : स्‍कूल बस-ट्रॅक्‍टरची समोरासमोर धडक; ४ विद्यार्थ्यांचा मृत्‍यू

अंकली : पुढारी वृत्तसेवा बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यात असलेल्या आलगुरु गावामध्ये स्‍कूल बस आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. ही घटना (रविवार) मध्यरात्री घडली. या अपघातात कवटगी येथील सागर कडकोळ (वय १७), श्वेता पाटील (१३), गोविंद (१३), बसवराज कोटगी (१७) या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आलगुरु गावातील वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गेले होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून शाळेच्या बसने कवटगी गावाकडे परतत असताना शाळेची बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली.

या भीषण अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार तर तिघांना उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्‍यांचा मृत्यू झाला. अन्य जखमी विद्यार्थ्यांना जमखंडी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद जमखंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button