म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते चंद्रहास धुमाळ यांचे हृदयविकाराने निधन

म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते चंद्रहास धुमाळ यांचे हृदयविकाराने निधन
Published on
Updated on

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते चंद्रहास एकनाथ धुमाळ (वय ७४) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. धुमाळ यांचा जन्म २४ जानेवारी १९४९ रोजी निपाणी येथे झाला. त्यांनी १९६७ पासून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बेळगाव जिल्ह्याचे सचिव म्हणून काम पाहिले. सीमा लढ्यात ते अग्रणी होते.

प्रा. चंद्रहास यांनी शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे ३२ वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. कर्नाटक भाषिक अल्पसंख्यांक संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. १९६७ साली किसान शिक्षण संस्थे मार्फत चिकोडी तालुक्यातील पहिली इंग्लिश मीडियम शाळा त्यांनी निपाणी येथे स्थापन केली. काही कारणास्तव ही शाळा हस्तांतरित करावी लागली. त्यानंतर १९८७ साली सीमा भागातील मराठी भाषिक बहुजन वर्गासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत नूतन मराठी विद्यालय बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक विभाग, श्री व्यंकटेश्वरा पदवी पूर्व कॉलेज, डी. एम. एल. टी. कोर्स, बालवाडी प्रशिक्षण केंद्र तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ दूर शिक्षण केंद्र अंतर्गत सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना २००९ मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नात व भाऊ असा परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news