बेळगाव : मनपात संघर्ष शिगेला | पुढारी

बेळगाव : मनपात संघर्ष शिगेला

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महापौरांना कारणे दाखवा नोटीस आल्यापासून सत्ताधारी भाजप आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

महापौर शोभा सोमणाचे यांनी राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीला सरकार उत्तर देईल, असे वक्तव्य पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.  तर शुक्रवारी (दि. 27) राज्यपाल बेळगावात असून महापौर सोमणाचे यांच्यासह भाजप आमदार, खासदारांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहेत. तर या वादात मराठा समाजाला ओढण्यात आले असून त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यामुळेच राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा शुक्रवारचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

Back to top button