कर्नाटकात शाळेतील मुलींना स्कर्ट ऐवजी चुडीदार, पँट वापरण्याची शिफारस | पुढारी

कर्नाटकात शाळेतील मुलींना स्कर्ट ऐवजी चुडीदार, पँट वापरण्याची शिफारस

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील खाजगी शाळांत शिकणार्‍या विद्यार्थिनींसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात यावी, अशी सूचना राज्य बाल हक्क रक्षण आयोगाने शिक्षण खात्याकडे केली आहे.

विद्यार्थिनी शर्ट आणि स्कर्ट असा गणवेश परिधान करुन शाळेला जातात. यातून विद्यार्थिंनींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागत असल्याने स्कर्टऐवजी चुडीदार अथवा पँट असा गणवेश निश्चित करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. सध्या सरकारी शाळांत चुडीदार वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.काही प्रतिष्ठित शाळांमध्ये स्कर्ट वापरणे बंधनकारक आहे. यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये नाराजी आहे. स्कर्टमुळे अनेकवेळा अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिंनींना स्कर्टऐवजी लेंहगा, जुडीदार, पँट असा गणवेश निर्धारीत करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थिंनीना स्कर्ट नको, असे मत मांडण्यात आले होते. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनीही याबाबत सूचना केली होती. त्यानुसार चुडीदारचा आग्रह धरण्यात आला आहे.

Back to top button