Karnataka cabinet expansion | कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा अखेर विस्तार, २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ | पुढारी

Karnataka cabinet expansion | कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा अखेर विस्तार, २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

बंगळूर, पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, कायथसंद्र एन. राजन्ना, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, शिवराज संगप्पा तंगडगी, डॉ. शरण प्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, डी. सुधाकर, संतोष लाड, एनएस बोसेराजू, सुरेश बी. एस., मधू बंगारप्पा, डॉ. एम. सी. सुधाकर आणि बी. नागेंद्र यांचा समावेश आहे. (Karnataka cabinet expansion) त्यांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे नेते रुद्रप्पा लमाणी यांच्या समर्थकांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) कार्यालयाबाहेर लमाणी यांना मंत्रीपद देण्याची मागणी करत निदर्शने केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गेले दोन दिवस दिल्लीत होते. सिद्धरामय्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर २४ जणांची यादी निश्चित केली होती. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सिद्धरामय्यांनी १९, शिवकुमारांनी १६ आणि खर्गे यांनी ५ आमदारांच्या नावांची शिफारस केली होती; मात्र एकूण २४ जागाच रिक्त असल्याने तिघांच्याही याद्यांमध्ये काटछाट करण्यात आली.

ज्येष्ठांवर जबाबदारी लोकसभेची

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्या निवडणुकीची तयारी करावी, त्यासाठी त्यांनी पक्ष संघटना वाढवण्याकडे लक्ष द्यावे, असे सुचवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातून २८ पैकी २० खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. ते गाठण्यासाठी पक्षाची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांकडे देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Back to top button