लोकसभा निवडणूक लढविणार : प्रकाश हुक्केरी | पुढारी

लोकसभा निवडणूक लढविणार : प्रकाश हुक्केरी

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेप्रमाणेच मोदींचा आगामी लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडणार नाही. आजपासून गावोगावी फिरून मतदारांचे आभार मानणार असून, लोकसभा निवडणुक लढविण्यास तयार असल्याचे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.

शनिवारी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हुक्केरी म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव पडला नाही. उलट राज्यात राहुल गांधींचा व काँग्रेसच्या लोकोपयोगी गॅरंटींचा प्रभाव पडला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदींचा प्रभाव उरणार नाही. उद्यापासूनच मी प्रत्येक गावागावात जाऊन मतदारांचे आभार मानणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत चिकोडी लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी वर्षभर जोमाने तयारीला लागणार आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर आपण वर्षभरात विविध निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकही कार्यकर्त्यांच्या सहकार्याने लढणार आहे. आतापासूनच मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन केले.

Back to top button