बेळगाव : जिल्हा, तालुका पंचायतींसाठी आतापासूनच तयारी | पुढारी

बेळगाव : जिल्हा, तालुका पंचायतींसाठी आतापासूनच तयारी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा सुरू असतानाच स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला प्रचार म्हणजे जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या उमेदवारीसाठीची चढाओढ सुरु असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

जिल्ह्यातल्या 18 विधानसभा मतदार संघात जिल्हा आणि तालुका मतदार संघ येतात. त्यामुळे स्थानिक नेते गावागावात प्रचारात गुंतले होते. त्या नेत्यांना काँग्रेस आणि भाजपने आमिषे दाखवली होती. स्थानिक नेतेही, ‘मी सध्या ग्रां.पं. सदस्य आहे. मला जिल्हा पंचायतीची उमेदवारी मिळाली पाहिजेत’ अशा अटी घालत राहिले.

सध्या मतदान संघाचा विस्तार आणि लोकसंख्येच्या आधारावर राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा पंचायतीच्या 91 आणि तालुका पंचायतीच्या 345 जागा वाढविल्या आहेत. यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातले माजी सदस्य आणि स्थानिक नेते उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुका संपताच जिल्हा व तालुका पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार आतापासुनच उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत.

Back to top button