बेळगाव : शहापुरात शिवभक्‍ताने इमारतीवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला | पुढारी

बेळगाव : शहापुरात शिवभक्‍ताने इमारतीवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा शहापूर भोज गल्‍लीत एका शिवभक्‍ताने इमारतीवर शिवरायांचा ११ फुटी अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिवजयंती दिनी या शिव पुतळ्याचे पूजन आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या स्वमालकीच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे स्वप्न पंधरा वर्षापासून होते, ते शिवजयंती रोजी पूर्ण झाल्याची माहिती शिवभक्त मिथुन पावसकर यांनी दैनिक पुढारीला दिली.

या प्रसंगी नगरसेवक जय जाधव, मंगेश पवार, शैलेश शेट्टी व सर्व कार्यकर्ते कुटुंब व मित्रपरिवार उपस्थित होते. यापूर्वी तहसीलदार गल्ली येथे गौरांग गेंजी या कार्यकर्त्याने आपल्या इमारतीवर शिव पुतळा उभारला होता. त्याबरोबर ग्रामीण भागात बसवन कुडची गावात नागेश दिवटे या शिवभक्ताने आपल्या तीन मजली इमारतीवर शिव पुतळा बसवला आहे.

हेही वाचा : 

Back to top button