बेळगाव : भगवे ध्वज लावलेल्या वाहनांची अडवणूक

बेळगाव : भगवे ध्वज लावलेल्या वाहनांची अडवणूक

बेळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वंटमुरीजवळ पोलिसांकडून कोल्हापूर येथून धरणे आंदोलन पार पाडून परत येणाऱ्या भगवे ध्वज लावलेल्या वाहनांची नाहक अडवणूक करण्यात आली. म. ए. समिती कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आंदोलन आटोपून कार्यकर्ते माघारी येत असताना सुवर्ण सौधकडे जाणार आहात का अशी विचारणा करत वाहन चालकांना नाहक वेठीस धरण्यात आले. या समिती कार्यकर्त्यांमध्ये बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वाहनांचा समावेश होता.

यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धारेवर धरत रस्त्यावरच ठाण मांडून निषेध नोंदवला. काकती पोलीस घटनास्थळी येऊन तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत इथेच थांबण्याची सूचना समिती कार्यकर्त्यांना करण्यात आली. यावर समिती कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविला. यानंतर पोलिसांनी वाहने जाऊ दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news