

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगावमध्ये पायाभूत सुविधा नसल्यामुळे येथील उद्योग नजीकच्या कागल पंचतारांकीत वसाहतीकडे वळत आहेत. महाराष्ट्र त्यांना चांगल्या सुविधा देत आहे. हे उद्योग रोखण्यासाठी कोणता तरी मोठा उद्योग आणा, पायाभूत सुविधा द्या, अशी मागणी आमदार अभय पाटील यांनी आज (दि.२३) विधानसभेत केली.
आमदार अभय पाटील यांच्या मागणीवर उत्तर देताना उद्योग मंत्री मुर्गेश निराणी म्हणाले की, बेळगावात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्याजबरोबर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर विशेष पॅकेजसह उद्योग देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल.
हेही वाचलंत का ?