बेळगाव : निपाणीजवळ ट्रकची कारला धडक; चौघे जखमी | पुढारी

बेळगाव : निपाणीजवळ ट्रकची कारला धडक; चौघे जखमी

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला समोरून धडक दिली. या अपघातात कारमधील चौघे तर ट्रकचालक असे एकूण पाचजण जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.११) दुपारी एकच्या सुमारास झाला. आसिफ खान (वय २४, रा. गुडगाव, हरियाणा) असे ट्रक चालकाचे नाव असून कार मधील कृष्णात शिंदे (वय ५६ रा.बेळगाव) यांच्यासह तिघेजण (नाव समजू शकले नाहीत) असे एकूण पाच जण जखमी झाले.

याबाबत अधिकची माहिती अशी की, ट्रक बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. हा ट्रक भुयारी मार्गावर आला असता चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक दुभाजकावर आदळून कोल्हापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या कारवर आदळला आणि सर्विस रोडवर जाऊन पलटी झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक विष्णू गडकरी यांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार रुग्णवाहिकेचे चालक राजू मठपती यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले.

यामध्ये कारमधील कृष्णात व ट्रक असिफखान यांना गंभीर तर इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पोलीस व रस्ते देखभाल कंपनीच्या भराने पथक कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून सुरळीत करून दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button