मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न; भीमसैनिक पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न; भीमसैनिक पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा हा नेहरू नगर परिसरातील डी. एड. कॉलेजच्या मैदानावर येताच दलित पॅथरने त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. युवा संघटनेच्या राज्याचे अध्यक्ष आतिश बनसोडे यांनी हा काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु, याठिकाणी उपस्थित असलेल्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बनसोडे यांना जागीच ताब्यात घेतले.

राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मंत्री तसेच राज्यपालांकडून महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य वारंवार केले जात आहे. दोन दिवसापूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करून रोष ओढावून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूर दौर्‍यावर होते.

विजापूर रोडवरील नेहरूनगर इथल्या मैदानावर गुरव समाजाचे अधिवेशन होते. या अधिवेशनाला मुख्यमंत्री दाखल होताच भीमसैनिक आतिश बनसोडे यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस याठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी बनसोडे यास ताब्यात घेतले.

हेही वाचलंत का?

Back to top button