

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, एकट्या चाललेल्या व्यक्तीला गाठून अथवा मागून दुचाकीवरून येऊन दागिने लांबवणारे चेनस्नॅचर्स कमी नाहीत. अशाच एका भामट्याने वृद्धेच्या गळ्यातील दागिना लांबविला… वृद्धा देखील ओरडली. परंतु, खरा दागिना हातात राहून बनावट दागिना गेल्याने तिने सुटकेचा निःश्वास सोडला.
त्याचे झाले असे… दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सभाभवनात लग्नाला गेलेली वृद्धा कपिलेश्वर उड्डाण पुलाखालून भांदूर गल्लीच्या कोपऱ्यावरून कपीलेश्वर मंदिराकडे परतत होती. येथे रेल्वे रूळाशेजारी भिंत बांधली असून त्याच्या बाजूने एका व्यक्तीला पळून जाता येते.
भामट्यांचा बंदोबस्त हवा सध्या पोलिस खाते फक्त अधिवेशनाच्या बैठकांमध्ये गुंतले आहे. त्यामुळे शहर परिसरात चोऱ्या वाढल्याचे दिसून येते. यामध्ये जर अशा चेनस्नॅचर्सनी डोके वर काढले तर याचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. या वृद्धेचा बनावट दागिना गेला म्हणून समाधान असले, तरी पोलिसांनी या चेनस्नॅचर्सना शोधून त्यांचा बंदोबस्त करायलाच हवा.
नेमकी हीच जागा हेरून भामट्याने वृद्धेच्या घेऊन पसार झाला. गळ्यातील दागिने लांबवण्याचा बेत आखला. फक्त बेत आखला नाही तर त्याने वृद्धा रेल्वे रूळाजवळ येताच गळ्यातील दागिन्यांना हात घालून जोराचा हिसका मारला. वृद्ध महिलेने सतर्कता दाखवत अचानक गळ्यातील दागिन्यांवर हात ठेवला. यावेळी दोन सोनसाखळ्यांपैकी एक सोनसाखळी चेनस्नॅचरच्या हाती लागली, तर दुसरी वृद्धेच्या हातात राहिली. वृद्धेला माहिती होते की यापैकी एक खरी तर दुसरी बनावट सोनसाखळी आहे. परंतु, एक चोरीला गेल्याने नेमकी खरी गेली की खोटी, हे समजले नाही. त्यामुळे तिने आरडाओरड सुरू केली. यावेळी आजूबाजूचे लोकही जमले.
परंतु, चोरटा रूळाकडेला असलेल्या भिंतीतील बोळाचा आधार वृद्धेच्या चेहऱ्यावर हसू चोरून नेल्याचे सांगितले. तिने आपल्या अंगावरील जो दागिना पकडला होता, तो पाहिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसले. येथील लोकांनाही आश्चर्य वाटले. कारण, हिचा दागिना जाऊनही महिला हसत का आहे, याचे कोडे त्यांना पडले. तेव्हा सदर वृद्धेनेच हे कोडे उलगडले.
अहो, त्या चोरट्याने जी सोनसाखळी नेली ती खोटी होती, खरी माझ्या हातात राहिली. तेव्हा कुठे लोकांनाही हे कोडे उलगडले. खरी सोनसाखळी वाचली अन् १००-२०० रूपयांची चोरीला गेल्याचे समाधान त्या वृद्धेच्या चेहऱ्यावर दिसत होते. परंतु, घेऊन जाणाऱ्या चोरट्याचे पुढे काय झाले, हे मात्र समजले नाही. कारण, याची नोंदच पोलिस ठाण्यात आधी घाबरलेल्या वृद्धेला येथील लोकांनी बाजूला बसवले. काय झाले हे विचारले, तेव्हा तिने गळ्यातील दागिने झालेली नाही.