मशिदीसारख्या बस स्टॉपवरील दोन घुमट अखेर हटवले | पुढारी

मशिदीसारख्या बस स्टॉपवरील दोन घुमट अखेर हटवले

म्हैसूर : वृत्तसंस्था :  महानगरपालिकेने उभारलेला बस स्टॉप मशिदीच्या आकाराचा असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर आता या बसस्टॉपवरील तीनपैकी दोन घुमट हटवण्यात आले आहेत.

म्हैसूर शहरातील हायवेवर महापालिकेच्या वतीने एक बस स्टॉप उभारण्यात आला होता. सोनेरी रंगाचे तीन घुमट असलेला हा स्टॉप मशिदीशी साधर्म्य दाखवणारा असल्याने तो पाडावा अशा प्रकारची मोहीम काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुरू होती. भाजपचे खासदार प्रताप सिंह यांनी हे छायाचित्र ट्विट करीत मशिदीच्या आकाराचा हा स्टॉप तत्काळ हटवला गेला नाही तर आपण बुलडोझर लावून तो भुईसपाट करू, असा इशारा दिला होता.

तसेच त्यांनी महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देऊन हीच मागणी केली. त्यानंतर प्राधिकरणाने महपालिकेला हा स्टॉप हटवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने तीनपैकी एक घुमट हटवला. दुसरीकडे ज्यांच्या आमदार निधीतून हा स्टॉप उभारण्यात आला, त्या आमदार एस. ए. रामदास यांनी हा स्टॉप म्हैसूर राजवाड्याची प्रतिकृती म्हणून उभारण्यात आला आहे. त्याचा मशिदीशी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button