बेळगाव : जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाकडून वडिलांचा घात | पुढारी

बेळगाव : जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाकडून वडिलांचा घात

अंकली (जि. बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा; राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रय योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने मुलानेच वडिलांचा निर्घृण खून केला. ही घटना जमखंडी तालुक्यातील रबकवी बनहट्टी येथे काल (शुक्रवार) घडली. मालापा हळूर (वय 65) असे खून झालेली व्यक्तीचे नाव आहे. तूकापा हळूर (वय 24) असे मुलाचे नाव आहे. रबकवी बनहट्टी पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

याबाबत रबकवी बनहट्टी पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, रबकवी बनहट्टी शहरात मळाप्पा हळूर यांची दोन गुंठे जमीन आहे. त्यामधील एकगुंठा जमीन मला आश्रय घर बांधण्यासाठी देण्यात यावी अशी मागणी माळाप्पाचा मुलगा तुकाप्पा वारंवार वडिलांकडे करत होता. मात्र वडिलांनी एक गुंठा जमीन देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून रागाच्या भरात मुलाने काल (शुक्रवार) दुपारी शेडमध्ये झोपलेल्या माळापाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.

या घटनेनंतर रबकवी बनहट्टी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयीत आरोपी तुकापा हळूर याला अटक करून त्‍याच्या विरूद्ध गुन्ह्याची नोंद केली.

हेही वाचा :  

Back to top button