बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांच्या बालकासह आईने नदीत उडी घेतल्याची घटना रामदुर्ग तालुक्यात शनिवार घडली. रुद्रव्वा बसवराज बन्नूर (वय 30) असे त्या महिलेचे तर शिवलिंगाप्पा बन्नूर (वय 2) असे बालकाचे नाव आहे. रामदुर्ग येथील मलप्रभा नदीच्या काठावर असणार्या व्यंकटेश्वर देवस्थानाजवळ ही घटना घडली.
नदीकाठी सापडलेल्या चपलांवरून तपासकार्य हाती घेण्यात आले आहे. घटनेची माहिती रामदुर्ग पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी अग्निशमक दलाल माहिती दिल्यानंतर. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन बोटींच्या सहाय्याने शोधकार्य हाती घेतले आहे.