बेळगाव : रिअल इस्टेट एजंटचा शस्त्रांनी वार करून निर्घृण खून | पुढारी

बेळगाव : रिअल इस्टेट एजंटचा शस्त्रांनी वार करून निर्घृण खून

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव शहरातील कॅम्प येथे रिअल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला. सुधीर कांबळे (वय ५७) असे रिअल इस्टेट एजंटचे नाव आहे. दुबईत राहणारा सुधीर दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे बेळगावला आला होता. शुक्रवारी रात्री उशिरा बेळगाव शहरातील कॅम्पातील फिश मार्केटजवळील घरात घुसून हल्लेखोरांनी सुधीरच्या पोटावर, मानेवर, हातावर व चेहऱ्यावर वार करून निर्घृण खून केला. कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरू केला आहे.

 

Back to top button