बेळगाव : उमेश कत्ती यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांबरा विमानतळावर | पुढारी

बेळगाव : उमेश कत्ती यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांबरा विमानतळावर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : अन्न व नागरी पुरवठा वनमंत्री उमेश कत्ती यांचे पार्थिव आज (दि.७) दुपारी अडीच वाजता सांबरा विमानतळावर विशेष विमानाने आणण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.
काही वेळ या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरटी माजी आमदार महातेश कवठगीमठ, माजी खासदार व केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे, खासदार इरांण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी रितेश पाटील आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव व त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button