बेळगाव : केपीटीसीएल परीक्षा घोटाळा दोघांना अटक | पुढारी

बेळगाव : केपीटीसीएल परीक्षा घोटाळा दोघांना अटक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटक वीज प्रसारण महामंडळ (केपीटीसीएल) मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी सोमवारी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. बिराप्पा लक्ष्मण हणमंडी (वय 24, रा. हणमंडी) शिवानंद दुंडाप्पा हळ्ळूर (वय 23 रा. अरभावी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी गोकाक पोलिस अधिक तपास करीत आहेत.

शिरहट्टी बी. के. येथे केपीटीसीएल कनिष्ठ अभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान उत्तरे लिहिण्यासाठी प्रिंट काढून देण्यासाठी विराप्पाने लॅपटॉप उपलब्ध करुन दिला होता. तसेच स्मार्ट वॉचही खरेदी केले होते. त्याच्याकडून 1 मोबाईल व 1 लॅपटॉप जप्‍त करण्यात आला आहे. तर शिवानंद याने परीक्षेत इलेट्रॉनिक डिव्हाईसचा वापर केला होता. त्याच्याकडून 5 मोबाईल व एक डिव्हाईस जप्‍त करण्यात आला आहे. त्यांच्या प्राथमिक चौकशीत या परीक्षा घोटाळ्याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Back to top button