बेळगावात बिबट्या दिसल्‍याने ‘त्‍या’ २२ शाळांना सुट्टी जाहीर (व्हिडिओ) | पुढारी

बेळगावात बिबट्या दिसल्‍याने 'त्‍या' २२ शाळांना सुट्टी जाहीर (व्हिडिओ)

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज (सोमवार) सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्‍तव शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नालतवाड यांनी या रस्त्यावर भरणाऱ्या 22 शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

बेळगावातील गोल्फ मैदान आणि पर्यावरण पार्कमध्ये गेली महिनाभर बिबट्याचे अधूनमधून दर्शन होत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .16 आगस्ट नंतर या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु आज सकाळी सहाच्या सुमारास एका वाहनचालकाला बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे पुन्हा या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव शहरातील 12 आणि ग्रामीण भागातील 9 शाळांचा समावेश आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पोलीस आणि वनविभागाच्या सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांकडून हा परिसर पिंजून काढण्यात येत आहे, मात्र बिबट्याचा मागमूस लागलेला नाही, त्याचे ठसेही आढळले नाहीत. त्यामुळे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

हेही वाचा :  

Back to top button