बेळगावच्या गणेशोत्सवावर 16 ड्रोन कॅमेर्‍यांची नजर

बेळगावच्या गणेशोत्सवावर 16 ड्रोन कॅमेर्‍यांची नजर
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सव काळात कोणतीच अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येईल. शहरातील गणेशोत्सवावर 16 ड्रोन कॅमेर्‍यांची नजर राहील. गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, अशी सूचना पोलिस आयुक्‍त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी केली आहे. स्थानिक पोलिसांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील मंडळांना नियमांची जाणीव करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना केली.

दहा दिवसांवर आलेल्या गणशोेत्सवासाठी आयुक्‍त बोरलिंगय्यांनी शनिवारी आयुक्‍तालयाच्या व्याप्‍तीत येणार्‍या पोलिस निरीक्षकांची बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

आयुक्‍त म्हणाले, गणेशोत्सव काळात सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोरपणे राबविण्यात यावी. त्यासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री पुरविण्यात येइल. शिवजयंती काळात सुरक्षेसाठी 8 ड्रोन कॅमेरे वापरण्यात आले होते. गणपतीसाठी 16 ड्रोन कॅमेरे वापरण्यात येतील. प्रत्येक गणेशोेत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेऊन सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची सूचना अधिकार्‍यांनी द्यावी. नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, याची जाणीव करून देण्यात यावी.

गणेशोत्सव काळात मंडळांनीही आपली जबाबदारी पार पाडावी. उत्सव सार्वजनिक असून सुरक्षेची जबाबदारी सर्वांची आहे. आवाजाची मर्यादा किती असावी, याबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना करावी. डॉल्बी आणि डीजेमुळे होणार्‍या दुष्परिणामांची माहिती देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी मंडळांना सहकार्य करण्यासाठी आवाहन करावे, अशी सूचना पोलिस आयुक्‍त बोरलिंगय्या यांनी पोलिस अधिकार्‍यांना केली. मंडळांनी प्रत्येक मंडपात स्वयंसेवकांची नेमणूक करावी. सुरक्षेच्या द‍ृष्टीने आवश्यक असणार्‍या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news