बेळगाव : दोघा चोरट्यांकडून सहा दुचाकी जप्त | पुढारी

बेळगाव : दोघा चोरट्यांकडून सहा दुचाकी जप्त

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  दोघा दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. विशाल करेप्पा परसन्नवर, (वय 28, रा. पार्वतीनगर, बेळगाव) व प्रकाश ऊर्फ अबक मारुती दळवाई (वय 19, रा. अनिगोळ, ता. बैलहोंगल) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी उद्यमबागसह शहर परिसरात दुचाकी चोरल्या होत्या.

संशयावरून एकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरीच्या सहा दुचाकी आढळून आल्या.
उद्यमबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक धीरज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक श्रीमती आर. पी. कदम, प्रोबेशनरी उपनिरीक्षक सरदारगौडा मुत्तत्ती, आय. एस. पाटील, श्रीमती अन्नपूर्णा एम. कांबळे, जी. एफ. हादिमनी, बी. ए. करीगार, एस. ए. कर्की, एम. एस. अमाते, एस. के. तिम्मापूर यांनी ही कारवाई केली.

Back to top button