बेळगाव : तलाठी, ग्रामसहायक एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

बेळगाव : तलाठी, ग्रामसहायक एसीबीच्या जाळ्यात

अंकली, संबरगी; पुढारी वृत्तसेवा : लाच स्वीकारताना अथणी तालुक्यातील बाळीगेरी येथील तलाठी व ग्रामसहायक एसीबीच्या जाळ्यात सापडला. तलाठी उमेश दनदमनी व ग्राम सहायक प्रल्हाद सनदी यांना बेळगाव येथील लाचलुचपत व भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला.

हारुगेरी येथील गणपती मोनाप्पा बडगेर यांनी सदर तलाठी व ग्राम सहायकाविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन पोलिस खात्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी पहिल्यांदा आठ हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी बडिगेर यांनी पहिल्या हप्त्यात तीन हजार रुपये दिले व काम करण्यासाठी सांगितले. परंतु पुन्हा त्यांनी दहा हजार पाचशे रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या बडिगेर यांनी एसीबीचे पोलिस अधीक्षक बी. एस. नेमगोंडा यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबी अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला असता ग्राम सहायक सनदी याच्याकडे एकोणीस हजार रुपये सापडले. जे. एम. करुणाकरशेट्टी, निरंजन पाटील, ए. एस. गोदिगोपा व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

Back to top button