निपाणी : दुचाकी शोधण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर गर्दी | पुढारी

निपाणी : दुचाकी शोधण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर गर्दी

निपाणी;  पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे कुर्ली आणि हदनाळ येथील चोरट्यांकडून दोन दिवसांपूर्वी तब्बल 41 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. याची माहिती शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मिळताच दुचाकी चोरीला गेलेल्यांनी दोन दिवसापासून येथील ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वाहन शोधण्यासाठी गर्दी केली आहे. सर्वच दुचाकींचे पुढील व मागील नंबर प्लेट काढल्याने आता चेसी नंबरवरूनच दुचाकी मिळवावी लागणार आहे.

दुचाकी मालकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून कागदपत्रे दाखवून आपली वाहने न्यायालयामार्फत घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसापासून पोलिस ठाण्याच्या आवारात दुचाकी गर्दी होत आहे.

Back to top button