बेळगाव : दोघा आंतरराज्य चोरट्यांना अटक; 22 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त | पुढारी

बेळगाव : दोघा आंतरराज्य चोरट्यांना अटक; 22 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

हुक्केरी; पुढारी वृत्तसेवा :  दोघा चोरट्यांना अटक करून त्यांंच्याकडून 22 लाखांचे दागिने जप्‍त करण्यात आले आहेत. हुक्केरी पोलिसांनी ही कारवाई केली असून एक़ मोटारसायकलही जप्‍त करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात येथील कोर्ट सर्कलजवळ एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्यात आले होते. त्याचप्रमाणे गोकाक, रायबाग व बेळगाव शहरातील विविध सराफी दुकानांत ग्राहक म्हणून जाऊन त्यांनी फसवणूक करण्यात आली होती.

जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील, उपाधीक्षक मनोज कुमार नायक, पोलिस निरीक्षक रफिक अहमद तहशीलदार, एल. एल. पत्तेण्णवर, ए. एस. सनदी, ए. एस. आय व गुन्हा शाखेचे सी. डी. पाटील, मंजुनाथ कब्बूर, जी. एस. कांबळे, एस. आर. रामदुर्ग, ए. एल. नाईक, यू. वाय. अरभावी, आर. एस. डंग, बी. व्ही. नाव्ही, एम. के. अत्तार आदींनी ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेले संशयित कर्नाटकमध्येच नव्हे तर वेंगुर्ला, कोल्हापूर, सोलापूर व इचलकरंजी येथील सराफी दुकानांत ग्राहक म्हणून जाऊन फसवणूक करत होते. ओळखपत्र, आधार कार्ड व फोननंबर देऊन मालकांना विश्‍वासात घेत होते. हुक्केरी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून 8 प्रकरणांचा छडा लावून एकूण 22, 73, 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्‍त केले.

कारवाईत सहभागी झालेले गोकाक उपअधीक्षक मनोजकुमार नायक, हुक्केरी पोलिस निरीक्षक रफिक अहमद तहशीलदार व त्यांच्या सहकार्‍यांना पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी 25000 रूपये बक्षीस देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

Back to top button