बेळगाव : यरगट्टीत किराणा दुकान फोडणार्‍या दोघांना अटक | पुढारी

बेळगाव : यरगट्टीत किराणा दुकान फोडणार्‍या दोघांना अटक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  यरगट्टी येथे किराणा दुकान तसेच घर फोडणार्‍या दोघा चोरट्यांना मुरगोड पोलिसांनी अटक केली. चोरीसाठी वापरलेली दोन लाख रू. किंमतीची मालवाहू टमटम व 51 हजारांचा किराणा माल जप्त केला.

काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी यरगट्टी येथील किराणा मालाचे दुकान फोडून किराणा साहित्य लांबवले होते. शिवाय घरफोडी करून किंमती साहित्य लांबवले होते. किराणा माल भरून नेण्यासाठी त्यांनी टमटमचा वापर केला होता. रामदूर्गचे उपअधीक्षक रामनगौडा हट्टी, मुरगोडचे निरीक्षक मौनेश्‍वर माली-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांना अटक केली. मुरगोड पोलिसांत नोंद झाली आहे.

Back to top button