बेळगाव : ग्रामीण भागातील अंगणवाड्याही स्मार्ट | पुढारी

बेळगाव : ग्रामीण भागातील अंगणवाड्याही स्मार्ट

जांबोटी; पुढारी वृत्तसेवा :  शिक्षणाचा पाया म्हणून अंगणवाडीची ओळख आहे. सध्या यात शासनाने अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील अंगणवाड्याही स्मार्ट बनत आहेत., असे प्रतिपादन आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. जांबोटी येथील नूतन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण केल्यानंतर आ. डॉ.निंबाळकर बोलत होत्या.

तालुका बालकल्याण अधिकारी राममूर्ती यांनी स्वागत केले. यावेळी आ. डॉ. निंबाळकर म्हणाल्या, तालुक्यात इतर विकासांबरोबर शैक्षणिक बाबतीतही आम्ही अग्रेसर असून येत्या काळात यात परिपूर्णता आणण्यात येईल. याची पूर्ण जबाबदारी अधिकारी, शिक्षिका, मदतनीस तसेच आरोग्य खात्याची आहे. त्यांनीच हा पाया मजबूत ठेवावा, अशा सूचना बालकल्याण खात्याच्या अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी आ. डॉ. निंबाळकर यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. तसेच अधिकारी, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस यांची बैठक बोलावून अडचणी जाणून घेतल्या. मुलांचे उत्तमप्रकारे संगोपन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मराठी नामफलकबाबत आ. डॉ. निंबाळकर यांनी तत्काळ याचा पाठपुरावा करण्याची सूचना अधिकार्‍यांना केली.

यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्ष मयुरी सुतार, सदस्य विलास देसाई, सडेकर, रवींद्र शिंदे, दीपक कवठणकर, दुर्गापा तलवार, संजय गावडे, महादेव कोळी, सुरेश जाधव, पीडिओ नागप्पा बन्नी, बांधकाम खात्याचे अभियंते भरमा, सखुबाई पाटील, लक्ष्मीी घाडी, सखाराम धुरी यांच्यासह शिक्षिका, मदतनीस व बालकल्याण खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

 

मराठीबहुल भाग असताना येथील नूतन अंगणवाडी इमारतीवर कन्नडसह मराठी नामफलक असणे आवश्यक असताना फक्‍त कन्नड फलक लावल्याने स्थानिक मराठी भाषिकांना कसे समजणार, हा प्रश्‍न असून या इमारतीवर मराठी फलक लावा. अन्यथा आंदोलन हाती घ्यावे लागेल.
– जयराम देसाई, जि. पं. सदस्य

Back to top button