बेळगाव : बैलहोंगलजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार | पुढारी

बेळगाव : बैलहोंगलजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका दुचाकीवरील वृद्ध ठार झाले. गदिगेप्पा कल्लाप्पा हावलदार (वय 62) राहणार सौंदत्ती असे मृताचे नाव आहे.

याबाबत बैलहोंगल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत गदिगेप्पा हे सौंदत्तीहून नेगिनहाळला दुचाकीवरून निघाले होते. यावेळी नेगिनहाळकडून एक कुटुंब दुचाकीवरून येत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीवरील सर्वजण पडले. कुटुंब असलेला दुचाकीस्वार, महिला व तीन वर्षांचे बालक जखमी झाले. विशेष म्हणजे हे तीन वर्षांचे बालक आजारी असल्यामुळे त्याच्यावर उपचार करून हे कुटुंब परतत होते. याचवेळी हा अपघात घडला. वृद्ध गदिगेप्पा यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच बैलहोंगलचे निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Back to top button