मंगळूर : भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीणकुमार हत्येप्रकरणी दोघांना केरळमध्ये अटक | पुढारी

मंगळूर : भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीणकुमार हत्येप्रकरणी दोघांना केरळमध्ये अटक

मंगळूर; पुढारी वृत्तसेवा  : मंगळूरमधील भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीणकुमार नेट्टारू याच्या हत्येप्रकरणी दोघा संशयितांना केरळमध्ये अटक करण्यात आली आहे. तर एकूण 21 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.मोहम्मद रफीक, झाकीर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांसह ताब्यात घेतलेले 21 जण एसडीपीआय, पीएफआय संघटनेचे आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी अलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा आज

मंगळूरमधील सुळ्या तालुक्यातील बेळ्ळारे येथे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई घटनास्थळी पाहणी करणार होते. शिवाय प्रवीणकुमार यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. पण, त्यांचा दौरा रद्द झाला. हा दौरा आज शुक्रवारी होणार आहे.­­

नेत्याच्या हत्येमुळे भाजपचा मेळावा रद्द

भाजप सत्तेवर येऊन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोड्डबळ्ळापूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण, मंगळूर येथे भाजप युवा मोर्चाच्या नेत्याची हत्या झाल्याने हा मेळावा रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी रात्री उशिरा हा निर्णय जाहीर केला.

येथे पत्रकारांशी बोलत होते. हत्या झाल्यानंतर धक्‍का बसला. शिमोगा येथील हर्ष याच्या हत्येप्रमाणेच प्रवीण यांची हत्या झाली. काहीजण शांतता आणि जातीतील सलोखा बिघवडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पीएफआय, एसडीपीआय संघटनांकडून अशा प्रकारच्या कारवाया होत असल्याचे दिसू आले आहे. त्या संघटनांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

Back to top button