बेळगाव : उज्ज्वला योजनेमुळे गरिबांची सोय | पुढारी

बेळगाव : उज्ज्वला योजनेमुळे गरिबांची सोय

संबरगी;  पुढारी वृत्तसेवा :  आ. श्रीमंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागामध्ये गरिबांना सरकारकडून उज्ज्वला योजनेच्या आधारे गॅस देऊन त्यांना अनुकूल केले आहे, असे भाजपचे युवा नेते व ग्राम पंचायत सदस्य संजय आदाटे यांनी सांगतिले.

मदभावी (ता. अथणी) येथे गरिबांना गॅसचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर चिकोडी जिल्हा भाजप उपाध्यक्ष विनायक बागडी पीएलडी बँकेचे संचालक महादेव कोरे, भाजप नेते आर. एम. पाटील राजू माने तालुका पंचायतचे माजी उपाध्यक्ष निजगुणी मगदूम, आप्पासाहेब चौगुला, कृष्णा शिंदे, बापू अभ्यंकर, हरळय्या समाजाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदाटे म्हणाले, राज्यात भाजप सरकार आल्यानंतर ग्रामीण भागात सर्वसामान्य गरिबापर्यंत गॅस जाऊन पोहोचले आहे. ही योजना पहिल्यांदाच अमलात आणली आहे. एकही कुटुंब गॅस योजनेविना राहू नये, असा त्यांचा उद्देश आहे.

भाजप चिकोडी जिल्हा उपाध्यक्ष विनायक बागडी म्हणाले. राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ग्रामीण भागात विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. कोणत्याही प्रकारचे पक्षपात न करता कामाचा आराखडा तयार करून सर्वसामान्यांची समस्या मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर येणार, असा विश्वास आहे. मतदारांकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
शिवाजी गाडीवड्डर, ईश्वर कुंभारे व्यक्ती उपस्थित होते.

Back to top button