बेळगाव : कारवारजवळ 26 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त | पुढारी

बेळगाव : कारवारजवळ 26 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

खानापूर; पुढारी वृत्तसेवा :  कंटेनरमधून गोवा येथून कारवार मार्गे हैदराबादला करण्यात येत असलेला 26 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा कारवार अबकारी विभागाने सापळा रचून जप्त केला.

गोवा बनावटीच्या दारुची (एम एच 04 एफ जे 9979) या कंटेनरमधून अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती अबकारी पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक प्रेमनगौडा पाटील, कॉन्स्टेबल राघवेंद्र नाईक, भगवान गावकर, संतोषकुमार के. बी. यांनी सापळा रचून कारवारपासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील बिनगा गावाजवळ कंटेनर अडवून तपासणी केली. त्यामध्ये दारूचे 814 बॉक्स आढळून आले.

या कारवाईत 30 हजार 212 बाटल्या व कंटेनर जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मद्यसाठ्याची किंमत 26 लाख 29 हजार 536 रुपये इतकी आहे. याप्रकरणी सुधाकर अर्जुन गोलांडे रा. पिंपळेवाडी, बीड या संशयितास अटक करण्यात आली आहे.

Back to top button