

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील बिडी होबळी येथील चुंचवाड गावात पावसामुळे भिंत पडून एका मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचे नाव अनंतराजा धरमेंद्र पाशेट्टी (वय१६) असे आहे. अनंतराजाच्या वारसांना आरटीजीएसने तातडीने पाच लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार नुकसान भरपाईची रक्कम अनंतराजाचे वडील धरणेंद्र पशेट्टी यांच्या बँक खात्यावर खानापूर तहसीलदार पी. डी. खात्यातून जमा करण्यात आली आहे. यानंतर आपत्तीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही तासांतच मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन जिल्हा प्रशासनाने अतिशय तत्परता दाखविली आहे.
हेही वाचलंत का?