बेळगाव : क्रुझर पलटी होऊन सात जण ठार, दहा जण जखमी | पुढारी

बेळगाव : क्रुझर पलटी होऊन सात जण ठार, दहा जण जखमी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कामगारांना घेऊन भरधाव वेगाने जाणारे क्रुझर वाहन पुलावरूनपलटी झाल्याने ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव गोकाक रस्त्यावरील कल्याळपुर येथे घडली. क्रुझरमध्ये असणारे सर्व कामगार बेळगावला येत असताना हा अपघात घडला आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी, गोकाक तालुक्यातील अक्कतेंगरहाळ गावातील कामगार क्रुझर वाहनाने बेळगावकडे येत होते. दरम्यान कल्याळपुर गावाजवळील पुलावरून जात असताना क्रुझर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पुलावरून खाली कोसळले. यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून मदत कार्य राबवले आहे.

हेही नक्की वाचा

बेळगाव : टँकरच्या धडकेत महिला ठार

बेळगाव : 117 किलो अमली पदार्थ करणार नष्ट : जिल्हा पोलिसप्रमुख

बेळगाव :‘सेकंड कॅपिटल’ला सेकंडहँड बसगाड्या

Back to top button